लखम सावंतानंतर त्यांचे पुतणे दुसरे खेम सावंत हे गादीवर बसले. त्यांनी आपली फोउज वाढवून पोर्तुगीज लोकांवर स्वाऱ्या करून त्यांच्यावर आपला वाचक बसविला. इतकेच नाही तर त्यांनी राज्याचा विस्तार हि केला. इस १६८९ मध्ये त्यांना विजापूर दरबाराकडून कुडाळ प्रांताच्या सरदेशमुखीच्या सनद व व दुय्य्म सरदाराची मानसदरबारी मिळाली. त्यामुळे बहुतालच्या राज्यांवर त्यांचे वर्चस्व वाढले. इस १७९७ साली औरंगजेब बादशाह ने विजापूर चे राज्य खालसा केले. तेव्हा खेम सावंतांनी त्यांचे स्वामित्व काबुल केले. मात्र कुडाळ चे प्रभू विजापूर च्या बादशहा च्या रसरदेशमुख पदाची सत्ता बळकावून बसले होते. ती त्यांची सत्ता सावंतांनी झुगारून दिली. इकडे सावंतांनी औरंगजेबाचे वर्चस्व जरी मेनी केले होते तरी त्यांच्या व मराठयांच्या लढाया चाललेल्या पाहून सावंतांनी हि संधी साधून ते मोगलांकडे काही एक पैसे पाठवीत नव्हते. या  सावंतांनी चराटे (आताची सावंतवाडी ) येथे आपले रंगायचे ठिकाण केले याच गावास पुढे सुंदरवाडी हे नाव मिळाले. ह्यावेळी हे सावंत कुणाची हि सत्ता न मनाता स्वतंत्र पाने वागत होते इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या प्रधानांच्या, सुभेदाराच्या वगैरे नेमणुका करून त्यांस वाटणे दिली. सावंत सुंदरवाडीस राहत असल्याने त्यांचे प्रधान, सुभेदार, आश्रित वगैरे लोक तेथे राहण्यास गेले. त्यामुळे सुंदरवाडीची फारच भरभराट झाली. सन १६०७ साली औरंगजेब मृत्य पावल्यानंतर सावंतांनी औरंगजेबाचे जे नावाला मात्र स्वामित्व होते तेही झुगारून दिले

फोंड सावंत