इकडे औरंगजेबाच्या मुलाने शाहू महाराजांची सुटका करून त्यांस दक्षिणेस जाण्याची परवानगी दिली. शाहू महाराज   ताराबाई पाशी आपले राज्य मागू लागले तिचा हेतू शाहू महाराजांना मुळीच राज्य देण्याच नव्हता म्हणून तिने कि हा शाहू नसून कोणी तोतया आहे. तिथे आपल्या पक्षाकडे ज्या ज्या सरदारांना वाळवून घेतले होते त्यामध्ये वाडीच्या सावंतांचा हि समावेश होता पण राज्याचे खरे वारस शाहू महाराज आहेत हि खात्री झल्यावर ते शाहू महाराज यांच्या पक्षात सामील झाले. शाहू महाराजांनी सावंतांची देशमुखी काबुल केली शिवाय कुडाळ व पंचमहाल याची सावंतांस बहाल केली. खेम सावंत हे सन १७०९ मध्ये निवर्तले व त्यांच्या मागून त्यांचे पुतणे फोंड सावंत हे गादीवर बैसले. त्यांना  कोल्हापूरकर आंग्रे व पोर्तुगीज यांच्याबरोबर वेळोवेळी झगडणे भाग पडले होते. विशेषतः त्यांस आंग्रे यांच्याकडून फार त्रास होत होता. तेव्हा त्यांनी १७२० मध्ये इंग्रजांशी तह केला एकमेकांनी एकमेकांस हरेक प्रकारे साहाय्य करावे व एकमेकांच्या मुलखास एकमेकांना वाजवी जकात देऊन व्यापार करण्यास मोकळीकी असावी असे ठरले. एतद्देशीय संस्थानिकांशी इंग्रज सरकारचे हे तह झाले त्यात हा पहिला आहे. फोंड सावंत हे सन १७३८ साली मृत्यु पावले त्यांच्यानंतर त्यांचे नातू रामचंद सावंत हे गादीवर बसले. ते अज्ञान असल्याने त्यांचे चुलते जार्जयराम सावंत हे कारभार पाहत. जयराम सावंत हे कर्तबगार व पराक्रमी असून त्यांनी आपल्या सुर्याने सावंतांचा चोहीकडे दरारा बसविला होता. व कारभार हि चोख चालविला होता. परंतु जयराम यांच्याविषयी कोणी दृष्टाने भलत्या साळत्या चाहत्या सांगितल्या. त्यामुळे दोघांचा बेबनाव होऊन जयराम सावंत यांनी १७५३ त राज्यकारभार पाहण्याचे सोडून ते कुडाळास जाऊन राहिले या अंतःकलहाचा पोर्तुगीजांनी चांगला फायदा घेऊन सावंतांवर स्वारी करून त्यांचा काही प्रांत हस्तगत केला व त्यांचावर खंडणी लादली.

तिसरे खेम सावंत