इकडे विजापूर च्या बादशहाने शिवाजीं पासून कोकण प्रांत जिंकून घेण्याकरिता आपले बलाढ्य सरदार बहलोल खान खवासखान. बाजी घोरपडे लखन सावंत यांच्याजवळ भरपूर दारुगोळा, धान्य सामग्री पायदळ फौज व घोडेस्वार घेऊन पाठवले. बाजी घोरपडे यांनी शहाजी महाराजांस धरून विजापूर बादशहा च्या स्वाधीन केल्यामुळे शिवाजी महाराजांचा त्यावर राग होताच. तो मुळोधस आहे हि संधी साधून त्यावर छापा टाकून त्यास ठार मारून मुधोळ जाळले हि गोष्ट वाचकांस माहिती आहेच. बहलोस खान व खवासखान यांनी बाजी घोरपड्याची हि दशा पाहून पोबारा केला नंतर सावंतांची खोड मोडन्यासाठी शिवाजी महाराजांनी कुडाळ देशावर स्वारी करून सावंतांची सर्व ठाणी किल्ले काबीज केले नंतर लखम सावंत यांनी पोर्तुगीज लोकांचा आश्रय घेतला. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज लोकांवरही स्वारी करून त्यांचा फोंडा येथील किल्ला काबीज केला. तेव्हा त्यांनी शिवाजी महाराज्यांशी तह करून त्यांना तोफा नजर केल्या इकडे लखम सावंत यांनीही आपला कारभारी पितांबर शेणवी यास शिवाजी महाराजांकडे पाठवून सन १६५९ च्या एप्रिल महिन्यात महाराजांशी पाच कलमी तह केला. या तहाने कुडाळ प्रांतातील जी ठाणी व किल्ले काबीज केले होते ती त्यांनी लखम सावंत यांच्या स्वाधीन केली व सावंतांनी तीनहजार फौज बाळगून जरूर लागेल तेव्हा त्या फौजेनिशी शिवाजी महाराजांना मदत करावी असे ठरले. या सावंतांच्या पदरी नं सावंत व राम दळवी असे असे दोन सरदार हुशार व जन्मर्द आहेत असे पाहून त्यांस शिवाजी महाराजांनी आपल्याकडे नोकरीस ठेवले. त्या दोघांपैकी राम दळवी फारच शूर आहे हे महाराजांच्या लक्षात आल्यावर त्याच्या स्वाधीन काही फौज करून कोकणातील काही प्रांताचा बंदोबस्त ठेवण्याची कामगिरी सांगितली. हा शूर लखम सावंत १६७५ ला मरण पावला.