|| ओम श्री कुलस्वामिनी व्यानमाता भवानी दैव्यै नमः || || ओम श्री कुलस्वामिनी व्यानमाता भवानी दैव्यै नमः || || ओम श्री कुलस्वामिनी व्यानमाता भवानी दैव्यै नमः || || ओम श्री कुलस्वामिनी व्यानमाता भवानी दैव्यै नमः || || ओम श्री कुलस्वामिनी व्यानमाता भवानी दैव्यै नमः ||
Click Hereप्रिय सावंत भोसले कुलोत्पन्न्न बन्दुभगिनिनो,


आपला जन्म एका गौरवशाली परंपरा असलेल्या पुरण व इतिहास प्रसिद्ध घराण्यात झालेला आहे. या सावंत भोसले घराण्याची पूर्वपीठीका, इतिहास आणि कुलदैवता यांची आपणास सुसंगत माहिती व्हावी या उद्देशाने हे निवेदन प्रकट करीत असताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे.

इक्ष्वाकु कुलोत्पन्न सुर्वांशी प्रभूरामाचान्द्रांचा ज्येष्ठ पुत्र लव, याचे आपण वंशज आहोत. या कुळात देवतातुल्य, सच्चरित, पुनायाश्लोक, महाप्रतापी पूर्वजांची मालिका होऊन गेली हे वेगळे सांगावयाची आवश्यकता नाही. चितोडचा महाप्रतापी कालभोज, उदेपुरचा रन प्रतापसिंह, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, तसेच कोकणात सावंतवाडीचे राजे बापूसाहेब सावंत ज्यांना खुद्द महात्मा गांधीनी रामराजा असे संबोधले होते. असे कित्येक महापुरुष या कुळात जन्माला आले. रजपूत क्षत्रियान्त अग्रपुजाचा मान याच घराण्यातील उदेपुरच्या महाराणाना अद्याप चालत आलेला आहे. जगातील एकमेव हिंदू सार्वभौम राज्य नेपाल हे या घराण्याचे आहे.

प्रभू श्री रामचंद्रांपासून १०८ वा पुरुष बाप्पा रावळ उर्फ कालभोज याचे लाहोरच्या आसपासच्या प्रदेशात राज्य होते. इस्लामि आक्रमानास टक्कर देण्यासाठी बाप्पा रावळ याने राजपुतांची एकजूट घडवून आणली. त्यावेळी चितोड गडावर परमारांचे राज्य होते. बाप्पा रावल ने परमारांचा पराभव करून चीतोद्गाडावर आपले राज्य स्थापन केले. म्हणून काल्भोजाला आपण आपले मुल पूर्वज मानतो. कलभोज आठव्या शतकात होऊन गेला. याच कलभोज्याच्या नावावरून भोसले हे आडनाव क्षेमसिह व सुजनसिह यांच्या वंशजान महाराष्ट्रात वास्तव्य केल्यावर प्राप्त झाले. काही लोक भोसाजी यांच्या नावावरून भोसले आडनाव झाले असे म्हणतात. परुंतु हा पुरुष सामान्य व्यक्तिमत्वाचा होता, व सुजनसिहापसून चवथ्या पिढीत झाला व भोसले हे आडनाव त्यांच्यापूर्वीच्या पिढीतले पूर्वज लावीत होते, असे इतिहास सांगतो. महाराष्ट्रात आल्यावर आपण कालभोजाचे वंशज अशी ओळख पाठवून दिल्यामुळेच भोज्याच्या नावावरून भोसले हे आडनाव पडले. प्रसिद्ध एतिहासिक कवी जयराम पिंडे काय म्हणतो ते पाहण्यासारखे आहे. शहजीचे उपनाव भोसले. वंशनाव -शिसोदिया, वर्ण- क्षत्रिय उर्फ राजपूत, गोत्र- कुशिक, असे लिहून भोज- भोला- भोसले- असे शब्द जयराम योजतो. आपण नागपूरचे आहोत असा एक गैरसमज सावंत भोसले मंडळीमध्ये आहे. परुंतु नागपूरची भोसल्यांची गादी, शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचे कारकिर्दीत स्थापन झाली त्यामुळे सावंत भोसले हे नागपुर्पैकी नाहीत, ते चौदाव्या शतकात कोकणात आले व मूळ राजस्थानातून त्यांनी महाराष्ट्रात प्रयाण केले हे ध्यानात ठेवावे.

इ. स. ११५८ सुमारास चितोडच्या (मेवाड) गाडीवर राणा रनसिह (कर्णसिह) हा होता. त्याला क्षेमसिह, राहप व माहप असे तीन मुलगे होते. रणसिहाच्या मागून क्षेमसिह राज्याधिकारी झाला, आपला कुलदेव एकलिंगजी असे हे राजे मानत. म्हापस शिसोदे येथेल जहांगरी मिळाली. चितोड येथील अधीपतीस रावल व शिसोदे येथील सरदाराना राणा असे म्हणत असत. महपाच्या मागून शिसोदे येथील अधिपतीस रावल व शिसोदे येथील जहागिरीचे स्वामीत्व त्याचा धाकटा भाऊ राहप याच्याकडे आले. सामंतसिहाच्या मागून सातवा राजा रावल रत्नसिह हा चितोडगडच्या राज्यावर १३ व्या शतकाच्या शेवटी आला. त्यावळी राहप चा १० वा वंशज राणा लक्ष्मणसिह हा शिसोदे येथील जहागिरीचा मालक होता. चीतोडच्या रत्नसिहाची पत्नी पद्मिनी अत्यंत रूपवान होती. तिची अभिलाषा धरून अल्लाउद्दिन खिलजी इ.स. १३०२ मध्ये फार मोठ्या सैन्यानिशी चालून गेला. चीतोडगडाला त्याचा सहा महिने वेध होता. त्यावळी पद्मिनीने सोळा हजार राजपूत स्त्रयानिशी आत्मसमर्पण केले. चितोडचा किल्ला अल्लाउद्दिनच्या ताब्यात गेला

शिसोद्यांचा राणा लक्ष्मणसिह आपल्या आठ मुलांसह अल्लाउद्दिनशी तो व त्याचे सात मुलगे मारले गेले. एक मुलगा अजयसिह जखमी होऊन परत आला आणि आपल्या बापाच्या मागून शिसोदे येथील जहागिरीचा मालक झाला. रणा अजयसिह यास सुजनसिह व क्षेमसिह असे दोन मुलगे होते. अजयसिहाने त्यांना मुंजा नामक दंगे खोराचे पारिपत्य करणायाच्या कामगिरीवर पाठवले. पण ते काम त्यांच्या हातून पार पडले नाही त्यानंतर त्याने आपला पुतण्या हंमीरसिह राणा लक्ष्मणसिहाचा ज्येष्ठ पुत्र अरिसिहा याचा मुलगा याच्याकडे ती कामगारी सोपवली. हंमीर ने मुन्जाला ठार मारून त्याचे शीर कापुन अजयसिह समोर ठेवले हंमीर चा पराक्रम पाहून अजयसिह संतुष्ठ झाला. आणि आपल्या वडील भावाचा हा मुलगा असून शिसोदे येथील राज्याचा वास्तविक अधिकारी आहे असे मनात आणून मुजाच्या रक्ताचा तिलक लावून त्यांना आपल्या मागून राजायाधिकारी ठरवले. त्यामुळे सृजनसिह व क्षेमसिह हे दोन हि मुलगे असंतुष्ठ झाले.

आपल्या चुलत भ्वाशी कलह करीत बसण्यापेक्षा स्वपराक्रमाने नूतन राज्य संपादित करण्यात वस्तविक पुरूषार्थ आहे असा पोक्त विचर करून आपली बायका मुले सैन्य सरदार इत्यादिसह ते दक्षिणेत आले.

हे दोघे बंधू इ.स. १३३४ मध्ये देवगिरीस आले. यावेळी सृजनसिहाचे वय ४४ वर्षे व क्षेमसिहाचे वय ४० वर्षे होते. इ.स. १३३६ मध्ये विजयनगरच्या राज्याची स्थापन झाली त्यावेळी धाकटा भाऊ क्षेमसिह हा विजयनगरकडे गेला. सृजनसिह बहामनी राज्याचा संस्थापक गुंगुहसन कडे नोकरीस राहिला. सृजनसिहाच्या १७ व्या पिढीत क्षत्रियकुलावातेस छत्रपती शिवाजी यांचा उदय झाला. सृजनसिहाचे वंशज सातारा कोल्हापूर येथील छत्रपती तंजावर, कच्छ, भूज येथील राजे, मुधोळचे घोरपडे, तरले दत्तवाड, गुंत्कीर वगैरे.

क्षेमसिह हा सावंत भोसले घराण्याचा मुळ पुरुष. सामंत राणा लक्ष्मणसिह याचा नातू. सामंत म्हणजे मांडलिक यावरून सावंत हे पाकृत आडनाव पडले. इ.स. १३४६ च्या सुमारास विजयनगरच्या माधव मंत्र्याने गोमांतकावर स्वारी केली. त्या स्वारीत क्षेमसिहाने पराक्रम गाजविला व माधव मंत्र्याकडून चंदगड, भीमगड, व त्या खालील कोकण भागाचे अधिपत्य मिळविले. त्याचा वंशज मांगसावंत आंबोली घाटातून खाली दक्षिण कोकणात उतरला युद्धशास्त्राकरिता सुरक्षित अशा कुनकेरी येथे त्याने वस्ती केली.

क्षेमसिह हा कुलदैवतेचा महान उपासक होता. त्याने आपला पूर्वज कालभोज उर्फ बाप्पा रावळ यास प्रसन्न झालेली भवानी (व्यानमाता) आपल्या सोबत हाणली होती. तिची व पूर्वजांच्या रजपूत वेशांतील प्रतिमांची त्याने कुणकेरी येथे आपल्या निवास्थानी देव्हारयात प्रतिष्ठापना केली. कुणकेरी (सावंतवाडी पासून दोन मैलावर) येथील या निवासस्थानात या भावनाची आज गेली ६५० वर्षे रोज सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते सावंतवाडीचे राजघराणे पिढयान पिढया या भावनाची उपसना करीत आहे. या देवीच्या पूजेनिमित्त आजही सरकार मासिक बिदागी देत आहे. म्हणूनच अखिल सावंत भोसले घराण्याची हि भवानी मूळ कुलदैवता आहे. त्यांनी इतिहासाचा मागोवा घेऊन त्याची सत्यता पटून घ्यावी व आपल्या कुलदेवतांची भक्ती करावी.

सावंत भोसले घराण्याची राजपूत क्षत्रिय कुलीनात्वाचा हा पुरावा कुणकेरी येथे आहे.


क्षेमसिहाच वंशज भामसावंत उर्फ मांगसावंत याची समाधी होडवेड (मठ) गावी आहे. त्याला गोमान्तकालीन फोंडाकिल्यात एक मुलगा झाला. त्याचे न फोंड सावंत. फोंड सावंतचा मुलगा सोमसावंत. क्षेमसिहापासून सोमसावंतापर्यंत घराण्यात एकाच पुरुष होता. सोमसावंत यास तीन मुलगे झाले. १) गोमसावंत २) रूप सावंत ३) पायसावंत.

इ.स. १४७३ मध्ये बहामनी सरदार वजीर महमद गवान याने सावंतांचा पराभव करून विजयनगरच्या अमला खालील कुडाळ कुडाळ प्रांत मुसलमानी अमलाखाली आणला त्यांना या स्वारीत मदत करणारया गोड ब्राम्हण प्रभूकडे त्या प्रांत्ची व्यवस्था सोपवली. विजयनगरचे हिंदुराज्य व बहमनिराज्य यांच्या सतत चाललेल्या रणकंदामुळे पुढे सावंतांना कुडाळ प्रांतावरील आपली सत्ता पूर्णपणे मिळवता आली नाही. परुंतु प्रभूदेसायाना रंगाने घाटाच्या दक्षिणेकडे हिरकू दिले नाही. इ.स. १५६५ मध्ये राक्षसतगडीच्या विजयनगर चा पूर्ण पाडाव झाल्यावर आदिलशहाने कर्नाटक व निजामशहाचे उत्तर कोकण, अर्धा कुडाळ प्रांत आपल्या राज्यात शामिल केला. इ.स. १५७० च्या सुमारास आदिलशहा व निजामशहा दोघांनी मिळून सावंतावर स्वारी करून त्यांचा पूर्ण पराभव केला व सावंतवाडी त्या भागाची सरदेसाकी दिली.

राज्यस्थापना


पायासावंतचा मुलगा खेमसावंत त्याचा मुलगा फोंडसावंत व फोंडसावंतचा महापराक्रमी मुलगा खेमसावंत (ओटनेकर) यास खेमसावंतानी सावंतवाडी संस्थांनचे राज्य प्रस्थापित केले.

वंश विस्थार

१) गोमसावंत (वडील भाऊ) कुणकेरी, माणगाव, माजगाव, कलेली, सांगेली, गरवट, बंदा (निमजगाव), आवळेगाव, कडावल, कसवन, पोखरण, वर्दे, पेंडूर, पणदूर, असरोंडी, किर्लोस, कासरल, तरंदळे, कोळोशी वळीवंडे, किल्ले, सिंधुदूर्ग, शिवडाव, शिरवल व तूरळक इतरत्रही (कुनकावळे, कुपवडे, जंभवडे) डामरे .

२) रूप सावंत - मधली शाखा: कुडाळ (किल्लेदार ) आकेरी, हुमरस, वेंगुर्ले, इन्सुली, कारिवडे, इन्सुली (पगा बिल्याची वाडी) इ. गावे.

३) पाय सावंत: धाकटी शाखा - राजे बहाद्दूर श्रीमंत शिवराम राजे भोसले घराणे, सावंतवाडी, हेरे (जहागीरदार)

या घराण्यची कुलदैवता भवानी, कुन्कारी येथे असलेली प्रतिमेचे रंगीत क्यानव्हास पोट्रेट प्रख्यात चित्रकार काळे यांजकडून रंगऊन घेतले आहे. त्या चित्राची फोटो कॉपी या घराण्यातील प्रत्येकाजवळ पूजेसाठी उपलब्ध व्हावी. म्हणून छापुन घेतली आहे.

आपल्या घराण्यातील सर्व घटकांची परस्पर प्रेम भावना वृद्धिंगत व्हावी आणि कौटुंबिक जिव्हाळ्याने आपण सर्वांनी एकत्र यावे यासाठी एक संस्था स्थापन करण्याचा मनोदय आहे. श्री भवानीच्या कृपेने हे शक्य होईल यात शंका नाही. तरी सर्व सावंत भोसले कुळातील बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे की श्री भवानीचे चित्र मिळविण्यासाठी तसेच संस्थेत सहभागी होण्याचा विचार विनिमय करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा, कळावे.

आपले सहृद

डॉ. पी. एम. सावंत भोसले, आसरोन्डकर
श्री. चंद्रकांत आ. सावंत भोसले, माझगाव
श्री. शशिकांत ना. सावंत भोसले, कुणकेरी
श्री. जयसिंगराव वि. सावंत भोसले पटेल, पेंडूर
अ बी. बी. सावंत भोसले, कुणकेरी
श्री. पी. ए. सावंत भोसले, माणगाव
श्री. अनाजी पां. सावंत भोसले, पेंडूर
श्री. दौलतराव बा. सावंत भोसले, आसरोन्डकर
श्री. वामन म. सावंत भोसले, कासरल
श्री. मुकुंद सि. सावंत भोसले, पोखरण
श्री. विनायक मु. सावंत भोसले, तारंदळे
श्री. शांताराम गो. सावंत भोसले, कुणकेरी
श्री. वाय. बी. सावंत भोसले, आसरोन्डकर
श्री. अमरसिंग श्री. सावंत भोसले, आकेरी
अ. भिमसिंग चं. सावंत भोसले, इन्सुली
अ. डी. एन. सावंत भोसले, आवळेगाव

निवेदन - शशिकांत सावंत (कुणकेरी)

शब्दांकन - कृष्णा वा. सावंत