नंतर त्याचे बंधू श्रीराम सावंत यांचा 23 जुलै 1900 मध्ये राज्यकारभार झाला. यावेळी असा ठराव झाला की सर्व कारभार राजेबहादूर यांच्या नावाने व शिक्याखाली पोलिटिकल सुप्रीडेंट यांनी नव्या हुद्याने चालवावी.सन 1909  पासून राजेबहादूर रावसाहेब हे पागा, देवस्थान व दरबार या खात्याची कामे पूर्ण मुखत्यारी ने पाहात असून त्यांना 4 मुलीव एक मुलगा अशी 5 अपत्ये होती. जेष्ठ कन्या श्री. सौ हंसराज या धार संस्थांन च्या महाराणी होत्या। श्रीराम सावंत उर्फ रावसाहेव हे 1913 मध्ये निवरतल्या नंतर त्यांचे पुत्र पाचवे खेमसावंत उर्फ बापूसाहेब गादीवर बसले.  त्यांनी इंग्लंड मध्ये इंग्रजी शिक्षण संपादन केले 1914 साली युरोपात युद्ध सुरू झाल्यावर त्यांनी जातीने मेसोपोटेमिया राणक्षेत्रात जाऊन ब्रिटिश सरकारास चांगली मदत केली व आपले क्षत्रतेज जगास दाखवून दिले.

सन1919 मध्ये महायुद्ध संपल्यावर ते आपल्या राज्यात सुखरूप परत आले. महायुधात त्यांचे शौर्य व धैर्य यांचे अवलोकन करून ब्रिटिश सरकारने त्याचा चांगला सत्कार केला त्यांना कॅप्टन आणि हीजहायनेस आशा दोन बहुमानाच्या पदव्या बहाल करून त्यांना 11 तोफांच्या सलामीचा मान दिला. याहीपेक्षा विशेष महत्वाची व आनंदाची गोस्ट म्हणजे सुमारे 86 वर्षयपर्यंत आपल्या हाती ठेवलेल्या राज्यकारभाराची सर्व सूत्रे इंग्रज सरकारने सन 19 ओकोंबर 1924 पासून  श्रीमंत राजेबहादूर बापुसाहेब यांच्या हाती दिली. 30 एप्रिल 1922 रोजी श्रीमंतांचा विवाह श्रीमंत महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या पुत्री कै. फत्तेसिह राजे यांच्या  कन्या श्री लक्ष्मीदेवी यांच्याशी बडोदा येथे झाला.श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या राज्यध्रीद्रोण समारंभ 29 ऑक्टोबर1924 रोजी मोठया थाटामाटात पार पडला. व त्यांना राज्यकारभार चालविण्याचा खलिता नेक नामदार सर लस्ली ऊईल्सन मुंबई इलक्याचे गव्हर्नर यांच्या हस्ते मिळाला.

बापूसाहेबांचा मृत्यू4 4 जुलै 1937 रोजी झाला त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शिवराम राजे सावंत भोसले यांचा दिनांक 12.5.1947 रोजी वयाच्या 21 व्या वर्षी राज्याभिषेक करण्यात आला. पण ते अज्ञान असल्याने सुरुवातीच्या काळात त्यांच्या मातोश्री राणी पार्वतीदेवी यांनी राज्यकारभार हाताळला. त्यांच्या काळात भरपूर प्रशासकीय सुविधा व शैक्षणिक प्रगती झाली.श्रीमंत शिवरामराजे भोसले यांनी मिल्ट्री मध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर काम करून देशसेवा केली. व 15 ऑगस्ट1947 साली देश स्वतंत्र झाल्यावर राजकारणात सक्रिय होण्यावर भर दिला. काँग्रेस पक्षाच्या जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर विविध पदांवर काम केले. त्यांनी सावंतवाडी चा कारभार पाहताना सुमारे 50 हुन अधिक संस्थांच्या क्रीडा संस्थनच्या माध्यमातून  समाजकार्य करण्यावर भर दिला. सावंतवाडी चे श्री पंचम खेमराज महाविद्यालय 1961 साली सुरू करून शैक्षणिक दृष्टीने मागास असलेल्या कोकण विभागाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले. ते राजकारनात सक्रिय झाल्यावर तीन वेळा सावंतवाडी तुन विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सन1956 ते 62, 62 ते 67 व 67 ते 72 व दोनवेळा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडणूक आले.

सन 1980 ते 85 व 1985 ते 90  महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी प्रभावी कार्य केले.व 13 जुलै 1995 ला निवर्तले. श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या साथीने त्यांचा पत्नी सत्वशीला देवी या देखील समाजसेवेत अग्रेसर राहिल्या. हातमाग लाकडी खेळणी आजही याची प्रचीती देत आहेत. मृत्यू दिनांक 18 जुलै 2018. शिवराम राजे भोसले यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र सध्याचे राजे श्रीमंत खेमराज सवांभोसले दिनांक 13 जुलै1995 रोजी गादीवर बसले. उच्चविद्याभूषित असूनही साधी राहणी उच्च विचार व परोपकारी प्रवृत्ती या नीतीचा वापर करून आजही ते राजवाड्यात सर्वसामान्यांना भेटून त्यांच्या शंकांचं निराकरण करतात. राजेसाहेबांच्या पत्नी शुभादेवी, राजकुमारी उर्वशी व युवराज लखम असा त्यांचा परिवार आहे. श्रीदेव पाटेकर व कुलस्वामिनी व्यानमाता भवाणीदेवी यांचा आशीर्वाद सदैव या राजपरिवरच्या माथी असुदे. ही समस्त सवंतभोसले वंशपरिवारातर्फे शुभेच्छा.

समाप्त