आपल्या फायद्याच्या बऱ्याचशा अरी त्यांच्याकडून काबुल करून घेतलय रामचंद्र सावंत सन १७५५ मध्ये वारले. रामचंद्र सावंत नंतर त्यांचे पुत्र तिसरे खेम सावंत हे गादीवर बसले. ह्यांनी गादीवर बसल्यावर ३६ वर्षाची म्हणजे सन १७९१ मध्ये पोर्तुगीज लोकांपासून त्यांनी घेतलेला मुलुख परत मिळविला. असा इतिहासात उल्लेख आहे. शिवाय त्यांच्या कारकिर्दी विषयी दुसरी आश्चर्यकारक बाब अशी कि एकामागून एक असे सुमारे २० कारभारी झाले. संस्थान च्या वाईट कारभारामुळे संस्थान कर्जबाजारी व परावलंबी बनले. असा इतिहासात उल्लेख आहे यावरून असा तर्क येतो कि सन १७६१ चे पूर्वी तरी या संस्थान गोंधळ अंधाधुंदी व बजबजपुरी असावी. जीवबादादा यांचे नाव दौलतराव सिंध्यांच्या कारकिर्दीत वारंवार येते. हे वाचकांना माहित असेलच. हे जीवबादादा बक्षी हे सावंतवाडी संस्थानातील केरी गावाचे रहिवासी या संस्थानाची सुधारणा होण्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केले. महादजी शिंदे यांची पुतणी लक्ष्मीबाई यांचा खेम सावंतांशी लग्नाचा योग्य आणिला. दिल्ली दरबारात शिंद्यांचे बरेच वजन होते. हे लक्षात घेऊन जीवबादादांनी दिल्लीच्या बादशहा कडून सावंतवाडी करांस राजेबहाद्दर हा ‘किताब व मोरचेलच मन मिळवून दिला १७९४ चे फेब्रुवारी महिन्यात महादजी शिंदे बैसले व शिंद्यांच्या गादीवर दौलतराव शिंदे बैसले. हे दौलतराव अज्ञान सल्याने जीवबादादा बक्षी हे शिंद्यांचे दिवाण झाले. जीवबादादा बक्षी गेल्यामुळे सावंतवाडी संस्थानास पुन्हा अंधाधुंदी सुरु झाली. ह्याचा फायदा पोर्तुगीज लोकांनी घेऊन पेडणे महाल काबीज केला. हे खेम सावंत १८०३ साली मरण पावले. त्यावेळी संस्थान कर्जाबाजारी होते. त्यांना पुत्र नव्हता म्हणून त्यांचा कारभार लक्ष्मीबाई यांनी चालविला

चवथे खेम सावंत