खेम सावंत याना श्रीराम सावंत याना चुलत चुलते होते. त्यांच्यात व लक्ष्मीबाई यांच्यात तंटेबखेडे झाले इतकेच नव्हे तर लढाया सुद्धा झाल्या. अखेर लक्ष्मीबाई व श्रीराम सावंत यांच्यात तडजोड होऊन श्रीराम सावंत यांनी आपला मुलगा रामचंद्र यास मांडीवर दत्तक दिले. सावंतवाडी संस्थान चे गाडे थोडेसे स्थिर होत होते इतक्यात कर्माने घाला घातला श्रीराम सावंत १८०६ साली मरण पावले. रामचंद्र सावंत व लक्ष्मबाई यांचे पटेना. शिवाय रामचंद्र सासवांत यांचे चुलत चुलते फोंड सावंत हे देखील त्यांच्या वाईटावर होते. सावंतवाडी संस्थानास अशी बजबज पुरी माजली आहे हे पाहून कोल्हापूर करणी सादर संस्थानांवर स्वारी केली. निपाणीकर सावंतवाडीकरांच्या मदतीला धावून आले. त्यांनी व सावंतवाडीकरांनी कोलाप्रकाराना पिटाळून लावले. १८०८ साली रामचंद्र सावंत यांचा खून झाला. व लागलीच थोड्या दिवसांनी लक्ष्मीबाई वारल्या. तेव्हा रामचंद यांच्या पत्नी दुर्गाबाई यांच्या हाती कारभार आला. त्या मोठ्या कारस्थानी होत्या त्यांनी फोंड सावंत यांस गाडीचे मालक करून स्वतः राज्यकारभार पाहू लागल्या. १८१२ साली फोंड सावंत एकाकी निवर्तले. दुर्गाबाई यांनी त्यांच्या ८ वर्षाशाच्या चिरंजीवास गादीवर बसवून चवथे खेम सावंत उर्फ बापूसाहेब असे नाव ठेऊन राज्यकारभार पूर्ववत स्वतः कडे ठेवला. गादीवर बसलेले खेमसावंत अल्पवयीन व राज्यकारभार पाहणाऱ्या अबला पाहून सावंतवाडीच्या काही लोकांनी आपणास गाडी मिळावी म्हणून बंड पुकारले. शिवाय दुसऱ्याही भानगडी उपस्थित केल्या. दुर्गाबाईंनी सुर्याने बंडाचा बिमोड करून जिकडे तिकडे स्वस्थात निर्माण केली. सन १८१९ साली दुर्गाबाई निवर्तले. त्या मोठ्या धोरणी व पोक्त होत्या. त्यांच्या मरणाच्या योगाने सावंतवाडी संस्थान ची भारी हानी झाली. हे पुढील हकीकतीवरून कळून येईल. दुर्गाबाई मागे बापूसाहेबांच्या पत्नी नर्मदाबाई राज्यकारभार पॉ लागल्या. त्यांनी दोन ते तीन वर्ष कारभार दुर्गाबाईंसारखा मोठ्या चतुराईने चालविला. परंतु बापूसाहेबाना आपल्या हाती राज्यकारभार हवा अशी हवं निर्माण होऊन त्यांनी नर्मदाबाईनसोबत तंटा आरंभिला. नर्मदा बाई यांनी राज्यकारभार सोडून दिला इतकेच नव्हे तर त्यांनी राजवाड्याचा सुद्धा त्याग केला. इकडे बापूसाहेबांनी तंटे करून कारभार आपल्याकडे घेतला. तो तरी उत्तम चालवावा! पण त्यांनी राज्यकारबहारके दुर्लक्ष केलं. राज्यांतील मामलेदार लोक वसूल केलेला ऐवज सरकार कडे भरणा न करता स्वतः गिळंकृत करू लागले. जकातीची हि तीच स्थिती झाली. संस्थानात स्वतंत्र दंगे सुरु झाले.

तेव्हा राजेसाहेबांच्या हातून राजकारभार अजिबात चालत नाही असे पाहून संस्थान ची राजव्यवस्था संस्थान तर्फे इंग्रज सरकार ने सन1838 साली आपल्याकडे घेऊन मिस्टर रिचर्ड पुलर यास पोलिटिकल सुप्रीडेंट च्या जागी नेमून त्यांचेकडे राज्यकारभार सोपविला 1844 साली प्रसिद्ध फोंड सवंतांच्या बंडास सुरुवात झाली. या बंडात खेम सावंतांचे चिरंजीव युवराज अण्णासाहेब सामील जहाल हे बंड सुमारे 4 वर्षे चालले.  ते अखेर इंग्रज सरकारने मोडून काढले. हे बंड मोडण्यासाठी सावंतवाडी संस्थान चे पाच लक्ष रुपये खर्च झाले. इंग्रज सरकारने जिकडे तिकडे स्तिरस्तावर झाल्यानंतर व्यवतीत पोलिस खाते निर्माण केले. राज्यात टपाल ची सोय शिक्षण वृद्धी दळण वळणाचे मार्ग पाण्याच्या सोयी खानेसुमारी इत्यादी लोकोपयोगी कामे केली. सन1867 साली चवथे खेमसावंत मरण पावले व त्यांचे चिरंजीव फोंड सावंत उर्फ अण्णा साहेब गादीवर बसले परंतु गादीवर बसल्या नंतर16 महिन्याच्या आत त्यांचा अंत झाला.

बाबासवंत