ज्यांना हल्ली सावंतवाडीचे सावंत असा म्हणण्याचा प्रघात पडला आहे त्यांचे उपनाव भोसले. उदयपूर येथील सिसोदिया घराण्यांपैकी असें हे सूर्यवंशी, ऋग्वेदी कौशिक गोत्री क्षत्रिय आहेत. हल्ली जे सावंतवाडी संस्थानाचा भाग आहे त्यास कुडाळ देश असे म्हणत असत. त्या देशाची देशमुखी सामंत नामक प्रभू घराण्याकडे होती. ह्या प्रभू देशमुखांकडे दळवी नावाने सेनापती होते. हे दळवी जोधपूर चे राहणारे. राजपुतान्याकडून जी जी घराणी आपलं नशीब काढण्यासाठी दक्षिणेत आली. त्यापैकी हे दळवी घराणे होय. इ.स. १५०० साली हल्लीच्या संस्थान चा भाग विजयनगर च्या राजाच्या अमलाखाली होता. त्यावेळी मंगनामक भोसल्याने काही प्रांत मिळवला. व होडावडे येथे आपले राहण्याचे ठिकाण केले. हा मंग सावंत शूर राजा होता. कुडाळ प्रांतावर तो राज्य करीत होता. कुडाळ प्रांताचा विस्थार. — उत्तरेस गढनदी पलीकडे पोलाशी महाल पूर्वेस सह्याद्री पलीकडे करवीर इलाका दक्षिणेस तेरेखोल ची खाडी पलीकडे गोवा प्रांत व पश्चिमेस अरबी समुद्र असा होता. हा प्रदेश सामंत नामक प्रभू चा होता. तेच उपनाव म्हणजे सामंत. हे उपनाव मांग भोसल्यास मिळाले सामंत यांचा अपभ्रंश सावंत सन १९५६ मध्ये आदिलशाही, निजामशाही कुतुबशाही वगैरे संयुक्त राज्ये व विजयनगर चा राजा यांच्यात तालिकोट येथे युद्ध होऊन त्यामध्ये विजयनगर राज्याचा नाश झाला. तेव्हा मंग सावंत याने मिळवलेल्या प्रांतावर आदिलशहा याची मालकी आली आदिलशाहीतून कुडाळ परगण्याच्या देशमुखीचे काम एका कुडाळ देशस्थ प्रभू घराण्याकडे देण्यात आले मंग सावंतास सादर देशमुखी आपणास मिळावी म्हणून इच्छा झाली त्याने त्यावेळी सामंत प्रभूंचा सेनापते देव दळवी यास सामील करून घेऊन सामंत प्रभूंचा पाडाव करण्यास प्रारंभ केला पण या कमी दोघांसही काहीएक लाभांश ना होता ते दोघेही सन १५८० मध्ये मरण पावले मंग सावंत ह्यास सात बायका होत्या त्यापैकी सहा बायका त्याच्याबरोबर सती गेल्या.

वंश विस्थार

चंदगडाहुजीपती नार्याशी सावंत हा सती गेलेल्या सहा बायकांपैकी वडील बायकोचा वंश होय. सातवी गरोदर होती तिला पुढे मुलगा झाला त्याचे नाव फोंड सावंत. या फोंड सावंत विषयी नमूद करावे असे विशेष काही घडले असे दिसत नाही. या फोंड सावंतापासून पहिले खेम सावंत जन्मले. या खेम सावंतांनी विजापूर च्या बादशहा कडून इस १६२७ साली देशमुखी सनद मिळवली १४ वर्ष उपभोग घेऊन ते इ.स. १६४० मध्ये निवर्तले. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा सोम सावंत गादीवर बसला हा इस १६५१ माधे मरण पावला ह्यासही मुलगा नसल्याने त्यांचे धाकटे बंधू लखम सावन्त हे देहसामुखीचे अधिकारी बनले. त्यांनी कुडाळ परगण्यातील प्रभू देशमुखांचा पाठपुरावा करून हाकून दिले मराठी राज्याचे संस्थापक शिवाजीमहाराज यांनी विजापूर यांच्या ताब्यातील कोकणप्रांत जिंकून घेऊन थेथे आपली सत्ता स्थापन केली होती.

लखन सावंत