वधु आणि वरांची माहिती पेज च्या शेवटी दिली आहे

आपल्या श्रीकुलास्वमिनी व्यानमाता भवानी देवी च्या वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत

महोदय / महोदया,
गेली ३५ वर्षे विविध उपक्रम राबवून सावंतभोसले वंशबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे सावंतभोसले श्रीकुलस्वामिनी प्रतिष्ठान मुंबई सर्वांना एकत्र आणण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करत असते.

वर्ष २०१६ पासून सदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून कुणकेरी मुक्कामी कुलस्वामिनी भक्तनिवास उभे राहत आहे…. बांधकाम प्रगती जोमाने सुरू आहे. कुणकेरी मुक्कामी कुलस्वामिनी भवानी व्यानमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या सावंतभोसले वंशबांधव / माहेरवाशिणीची मागणी असायची ” कुलस्वामिनीच्या सेवेसाठी कुणकेरी येथे राहायची सोय/ सुविधा असावी. ” त्यातूनच कुलस्वामिनी देवघर कुटुंबाने भक्तनिवास बांधण्यासाठी साडेसहा गुंठे बक्षीसपात्र जमीन देउन मदतीचा हात पुढे केला.

आणि मग कुलस्वामिनी भवानी व्यानमातेच्या आशीर्वाद / कृपेच्या आणि समस्त सावंतभोसले वंशबांधव / माहेरवाशिणीच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावर भक्तनिवास बांधणीसाठी सदर प्रतिष्ठान पुढे सरसावले. येत्या २ वर्षात ३ मजली भक्तनिवास उभे राहिलेले दिसेल.

सोशल मिडियाच्या माध्यमातून हजारो वंशबांधव / माहेरवाशिणी प्रतिष्ठानच्या छत्राखाली एकत्र येताहेत. त्यातून नोकरी भरती, नोकरी परीक्षा, व्यवसाय संधी, स्वतःचे व्यवसायातुन ईतरांना मदत करणे अशा गोष्टी whatsapp, facebook च्या माध्यमातून शेअर करताना दिसत आहेत.

आणि मग यातूनच एक कल्पना पुढे आली.. आपण एवढी मंडळी एकत्र आहोत तर , का मग एकमेकांना आपल्या घरातील / नात्यातील वधू वर स्थळे सुचवू नयेत ? म्हणूनसर्व कुलस्वामिनी whatsapp ग्रूपवर वधू- वर स्थळे पोस्ट करण्यास सुरुवात झाली. पण मोबाईलची क्षमता ध्यानात घेता तसेच प्रत्येकाला सर्व स्थळे एकत्र न पाहता येणे ह्या बाबी ध्यानात घेऊन, whatsapp ग्रूपवर आलेली सर्व वधू – वर स्थळे www.bhavanimata.com वेबसाईटवर एकत्रित पाहता यावी ह्यासाठी * सावंतभोसले वधू – वर सुचक मंडळ * ची निर्मिती करीत आहोत. हे वधू – वर मंडळ सर्वांसाठी खुले राहील. मात्र वधू वर स्थळे सर्व कुलस्वामिनी whatsapp ग्रूपवर पोस्ट करावी लागतील.

सावंतभोसले श्रीकुलस्वामिनी प्रतिष्ठान मुंबईचा * सावंतभोसले वधू- वर सूचक मंडळ * हा उपक्रमदेखील यशस्वी होवो ही कुलस्वामिनी भवानी व्यानमातेचरणी प्रार्थना.
*-*******

विजय वि सावंतभोसले, अध्यक्ष

कृष्णा वा सावंतभोसले, सरचिटणीस

वधु आणि वरांची माहिती