प्रत्येक माणसाच्या संचित प्ररब्धाच्या हिशेभाप्रमाने त्याने कूठल्या कुळात जन्माला यावे हे ईश्वरी इच्छेने घडत असते. त्या त्या कुलदैवतांच्या कृपाशीर्वादाने त्या त्या मनाची आत्मन्न्ती होत असते. कुलदैवत व गोत्र हे सोबत घेवून माणूस जन्माला येतो. त्या योनी मध्ये विविध कर्मे करता करता पुन्हा कर्मबंधनात गुरफटत जाऊन तो मृत्यू पवतो व पुनशछ पुनर्जन्माच्या वर्तुळाच्या फेरयात अडकतो. काही तुरळक आत्म्यांना मोक्ष प्राप्तीचा मार्ग सापडतो.

अनेक जन्मामध्ये वेगवेगळ्या योनीमध्ये जीव जन्माला येत असतो. त्यावेळी त्याला मिळालेली संगत, संस्कार प्राप्त झालेले ज्ञान यावर अत्मन्नोती अवलंबून असते. मानवजन्म श्रेष्ठ मानलेला आहे. कारण मानवाला सदसदविवेक बुद्धी प्राप्त झालेली असते.

शिव व शक्ती यांचं संयोगातून ब्रम्हांडाची निर्मिती झालेलेली असल्यामुळे प्रत्येक प्राणीमात्रावर शिवशक्तीचा अंमल असतो. त्या अमलानुसार त्या त्या जीवाला विविध गती मिळत जातात. मनाच्या बाबतीत सांगायचे म्हणे त्याचा मूळ गुरु म्हणजे त्याचे कुलदैवत. म्हणून माणसाच्या कुलदेव हा शिवाचा अंश व कुलदैवता हि शक्तीचा अंश असलेलीच राहणार. त्यात पुन्हा पुन्हा कुलादेवापेक्षा कुलदैवतेल मन जास्त रहातो. कारण आपण मातापित हा शब्द वापरतो. मत हा प्रथम गुरु असल्या मुळे मातेला श्रेष्ठपण दिलेले आहे. ” स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” हि काव्यपंक्ती सर्व सर सांगून जाते. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी फक्त कुलदैवतेचाच उच्चार होताना दिसतो.

आपण विविध प्रसंगी पूजा करताना विघ्नहर्ता गणेशा नंतर श्रीकुलदैवतेचा उच्चार करतो. एवढे महत्व कुलदैवतेला आहे.

तिच्या आधाराशिवाय, तिच्या आशीर्वादाशिवाय, तिच्या तेज्याशिवाय आपण शुन्य आहोत. हि जाणीव जेव्हा माणसाला होते त्याचवेळी त्याची वाटचाल त्याच्या अंगीकृत विविध क्षेत्रातिल प्रगतीकडे होताना दिस्ते. सध्याच्या प्रचलित भाषेत सांगायचे म्हणजे कुलदैवता हि मास्टर कि (मुख्य किल्ली) आहे. मुख्य किल्ली लावल्या शिवाय तिजोरी उघडता येत नाही. त्याचप्रमाणे कुलदैवतेच्य कृपाशिर्वादाशिवाय इतर कुठलीही देवता तुमच्या प्रकातानात ढवालाढवळ करू शकत नाही. म्हणून मुख्य किल्लीचा वापर करणे हि आयुश्याची इतिकर्तव्यता ठरते. इतर देवता त्यांच्या प्राप्त शक्ती प्रमाणे तुम्हाला संरक्षण देतील, पण भाग्योदय, समृद्धी याला कुलदैवतेच आशीवार्द हवाच, हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही.

आपला नम्रहितेचू ,
लवू आत्माराम सावंत

प्रतिष्ठान सल्लागार – मो. ९८२०४२९३११, मुलुंड (पु)